BYJUs CEO Sakal
देश

BYJU's CEO : I am truly Sorry! काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची मागितली माफी; भावनिक होऊन म्हणाले...

रविंद्रन यांनी एचआरला काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरी पदं देण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

कंपनीचा फायदा आणखी वाढवण्यासाठी बायजू या कंपनीने जवळपास २५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचं ठरवलं आहे. यासाठी आता बायजूचे संस्थापक रविंद्रन यांनी स्वतः काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. एवढ्या मोठ्या संस्थेचं हित आणि कार्यपद्धती जपण्यासाठी हा निर्णय़ घ्यावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

बायजू या शैक्षणिक प्लॅटफॉर्मने २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्मचारी संख्येच्या ५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येत आहे. याबद्दल स्वतः संस्थापक रविंद्रन यांनी कर्मचाऱ्यांना मेल करत त्यांची माफी मागितली आहे. तसंच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामात रुजू करून घेणं याला आपलं प्राधान्य असेल, असंही रविंद्रन यांनी म्हटलं आहे.

आपल्या भावनिक पत्रात रविंद्रन म्हणतात, इतरांना वाटतंय की मी तुम्हाला काढून टाकलंय, पण मी केवळ तुम्हाला थोडा वेळ बाजूला ठेवलं आहे. आपल्या कंपनीची वाढ कायम ठेवत तुम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घेणं यालाच इथून पुढे माझं प्राधान्य असेल. ज्यांना बायजूज सोडून जावं लागत आहेत, त्यांची मी मनापासून माफी मागतो. तुम्ही माझ्यासाठी केवळ एक नाव किंवा केवळ एक आकडा नाही. तुम्ही केवळ माझ्या कंपनीचे ५ टक्के नसून, तुम्ही माझ्यातलेच ५ टक्के आहात. तसंच रविंद्रन यांनी एचआरला काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरी पदं देण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

SCROLL FOR NEXT