National News Political News UP Bihar Bypoll SP Ahead in Gorkhpur 
देश

Bypolls Election Result: तीन लोकसभा तर 29 विधानसभा जागांचा आज निकाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तीन लोकसभा आणि 29 विधानसभा जागांवर 30 ऑक्टोबर रोजी 50 ते 80 टक्के मतदान झालं होतं. लोकसभा जागांमध्ये दादरा नगर हवेली, मंडी(हिमचाल प्रदेश) आणि खंडवा (मध्यप्रदेश)मध्ये मतदान पार पडले. यामध्ये मंडी आणि खंडवामध्ये भाजपचे खासदार होते तर दादरा नगर हवेलीमध्ये अपक्ष खासदार होते. तर 29 विधानसभा जागांमध्ये आसामच्या पाच, बंगालच्या चार, मध्य प्रदेश, मेघालय आणि हिमाचलच्या प्रत्येकी तीन तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकच्या प्रत्येकी दोन, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगानाची प्रत्येकी एक जागा समाविष्ट आहे. या 29 जागांमधील सहा जागा भाजपकडे होत्या. तर 9 जागा काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांकडे होत्या.

मुख्य उमेदवारांबाबत बोलायचं झालं तर कृषी कायद्यांचा विरोध करत हरियाणा विधानसभेमधून राजीनामा देणारे अभय चौटाला आणि हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह देखील यामध्ये आहे. दादरा नगर हवेली लोकसभा जागेवर 75.51 मतदान झालं असून अपक्ष खासदार मोहन देलकर यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक घ्यावी लागली. या ठिकाणी देलकर यांच्या पत्नी बलाबेन देलकर शिवसेनेकडून तर भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोडी मैदानात आहेत. हिमाचलची जागा खासदार रामस्वरुप शर्मा यांच्या निधनामुळे रिकामी झाली होती. त्याठिकाणी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह तर भाजपचे नेता खुशाल सिंह ठाकूर मैदानात आहेत. मध्यप्रदेशातील खंडवा जागेवर भाजपचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांच्या मृत्यूमुळे ही निवडणूक होत आहे. तिथे भाजपने ज्ञानेश्वर पाटील तर काँग्रेसचे ठाकूर राजनारायण पुरनी मैदानात आहेत. तिथे जवळपास 64 टक्के मतदान झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT