

Lawrence Bishnoi
esakal
लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित कुख्यात गँगस्टर हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. हॅरी बॉक्सरवर भारतात हत्या, खंडणी उकळणे आणि धमकावण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही हॅरी बॉक्सरनेच स्वीकारली होती.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link:
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली होती. हल्लेखोरांनी 'शेट्टी टॉवर' इमारतीच्या बाहेर अनेक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. विशेष म्हणजे, ज्या वेळी हा गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी स्वतः घरातच उपस्थित होते; सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते.