Bypolls in 13 Assembly seats in seven States on July 10 Electon Commsson marath news Update  
देश

Bypolls : लोकसभेनंतर आता सात राज्यात विधानसभेची रणधुमाळी! 'या' 13 जागांसाठी 10 जुलैला होणार पोटनिवडणूक

Assembly Bypoll Election 2024 : ज्या 13 मतदारसंघात मतदान होणार आहे, त्यात पश्चिम बंगालमधील 4, हिमाचल प्रदेशातील 3, उत्तराखंडमधील 2 तर मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, तामिळनाडूमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सात राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठी येत्या 10 जुलै रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी देण्यात आली. विधानसभा सदस्यांचा राजीनामा अथवा त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

ज्या 13 मतदारसंघात मतदान होणार आहे, त्यात पश्चिम बंगालमधील 4, हिमाचल प्रदेशातील 3, उत्तराखंडमधील 2 तर मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, तामिळनाडूमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील 9 आमदार अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. या जागांसाठी निवडणूक आयोगाला भविष्यात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. 10 जुलै रोजी प. बंगालमधील राणाघाट दक्षिण, रायगंज, बागदा आणि मानिकताला या मतदारसंघांत मतदान होईल. यातील पहिल्या दोन मतदारसंघातील आमदारांनी राजीनामा दिला होता तर इतर दोन मतदारसंघातील आमदारांचे निधन झाले होते.

हिमाचलमधील देहरा, हमीरपूर आणि नालागड मतदारसंघात तेथील आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. उत्तराखंडमधील बदरीनाथ मतदारसंघात राजेंद्र भंडारी यांनी राजीनामा दिल्याने येथे निवडणूक होत आहे. तर अन्य एका मतदारसंघात आमदाराचे निधन झाल्याने तेथे मतदान घ्यावे लागत आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि पंजाबमधील क्रमश: अमरवाडा, रुपौली आणि जालंधर पश्चिम येथे आमदारांच्या राजीनाम्यामुळे तर तामिळनाडूत विकरावंडी येथे आमदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT