narendra modi farmer 
देश

Farmer Protest: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ऊसाच्या FRP मध्ये वाढ

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने ऊस खरेदीची किंमत आठ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऊसाची किंमत ३१५ वरुन ३४० झाली आहे. ऊस उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना ऊसासाठी योग्य किंमत देण्यासाठी या हंगामात १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४-२५ वर्षासाठी साखर कारखान्यांकडून प्रति क्विंटल ३४० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या दहा वर्षात सरकार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आधी अनेक वर्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची किंमत मिळायची नाही. त्यामुळे कारखाना मालक वेळेवर शेतकऱ्यांना पैसे द्यावे. त्यांची अडवणूक करु नये यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मागील वर्षी ऊसाची एफआरपी ३१५ रुपये होती ती यावर्षी ३४० करण्यात आली आहे.

पैसे थेट खात्यात जमा

२०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांना १.२८ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. २०२२-२३ मध्ये १.९५ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. एमएसपीमध्ये वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना लाभ झाला आहे, असं ठाकूर म्हणाले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिक विकास अपेक्षित आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT