UP cabinet 
देश

निवडणूक चार महिन्यांवर असताना योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळात सात नव्या मंत्र्यांना स्थान; दलित, ओबीसी, ब्राह्मणांना दिलं प्रतिनिधीत्व

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचा रविवारी बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी सात नव्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये चार ओबीसी, दोन दलित आणि एक ब्रह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. केंद्रात मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक मंत्री आहेत. महिन्याभरापूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातही पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातून १५ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे.

योगी सरकारच्या या मंत्रिमंडळात काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले जितिन प्रसाद यांच्यासह पलटू राम, संजीव कुमार, संगीता बिंद, दिनेश खटिक, धर्मवीर प्रजापती आणि छत्रपाल गंगवार या सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. यांपैकी जितिन प्रसाद यांना कॅबिनेट मंत्रिपद तर इतरांना राज्यमंत्रीपदं देण्यात आली आहेत. राज्यपाल अनंदी बेन पटेल यांनी या सर्वांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील या मंत्रिमंडळ विस्तारावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, "युपीतील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे कपटाचं राजकारणं आहे. साडेचार वर्षात ज्यांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना आज प्रतिनिधित्व देण्याचं नाटक केलं जात आहे. जोपर्यंत नव्या मंत्र्यांच्या नावांच्या पाटीवरचा रंग सुकेल तोपर्यंत तर २०२२ निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. भाजपच्या नाटकाचा तिसरा अंक सुरु झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT