देश

CCD च्या प्रमुखपदी मालविका हेगडे?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 'कॅफे कॉफी डे'चे (CCD) मालक, संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर आता त्यांच्या जागी कंपनीच्या प्रमुखपदी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. 

सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, त्यांचा मृतदेह आढळला. ही माहिती समजल्यानंतर उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येनंतर आता मालविका हेगडे यांच्याकडे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद जाण्याची शक्यता आहे. तसेच संचालक मंडळाकडून नितीन बगमाने यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.  

याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की मालविका या कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. त्यानुसार कार्यकारी मंडळाकडून त्यांना या पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार पडताळणी केली जात आहे. मात्र, हे सध्या लगेच शक्य नाही. जेव्हा मालविका धक्क्यातून सावरतील तेव्हा याबाबत विचार केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर आणखी परिणाम होणार, हवामान विभागाचा अंदाज

Reliance Shares: दिवाळीपूर्वीच पैशांचा पाऊस...! एकाच दिवसात कमावले ७९,७०० कोटी रुपये; अदानी अजूनही पुढे

Manoj Jarange: मी मॅनेज होणारा नाही ; माझ्या नादी लागू नका! ; राज्य सरकारला मनोज जरांगे यांचा इशारा

Indian Navy: युद्धनौकांसाठी ५३ हजार कोटींचे करार;‘गार्डन रिच’, ‘गोवा शिपयार्ड’ करणार निर्मिती

Human Consciousness: मानवी चेतनेचे उन्नयन

SCROLL FOR NEXT