देश

शिवलिंग हटवण्याचा आदेश लिहिताना बेशुद्ध पडला असिस्टंट रजिस्ट्रार; न्यायमूर्तीही घाबरले? अन्...

Assistant registrar unconscious : एका प्रकरणात कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी एका वादग्रस्त जमिनीवरुन शिवलिंग हटवण्याचा निर्णय दिला होता

सकाळ डिजिटल टीम

Assistant registrar unconscious during writing ruling over shivling

नवी दिल्ली- कोलकाता हायकोर्टात एका प्रकरणावर सुनावणीदरम्यान विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. एका प्रकरणात कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी एका वादग्रस्त जमिनीवरुन शिवलिंग हटवण्याचा निर्णय दिला होता. कोर्टाचा हा निर्णय नोंदत असताना असिस्टंट रजिस्ट्रार बेशुद्ध पडल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर असिस्टंट रजिस्ट्रारला कोर्टातील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. माहितीनुसार, या सर्व प्रकारानंतर न्यायमूर्तींनी आपला निर्णय बदलला.

मुर्शिदाबादच्या बेलडांग येथील खिदिरपूरचे रहिवासी सुदीप पाल आणि गोंविंद मंडल यांच्यामध्ये जमीन प्रकरणावरुन वाद होता. वाद हाणामारीपर्यंत पोहोचला, त्यानंतर एकाने कोर्टात धाव घेतली. दाव्यानुसार, गोविंदाने वादग्रस्त जमिनीवर एका रात्री शिवलिंग ठेवून दिले. भडकलेल्या सुदीपने याची तक्रार पोलिसांत केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले पण काही कारवाई न झाल्याने सुदीपने कोलकाता न्यायालयात प्रकरण नेले.

याचिकाकर्ता सुदीप पालचे वकील तरुणज्योती तिवारी यांनी कोर्टात सांगितलं की, गोविंदाने जाणूनबुजून वादग्रस्त जमीनीवर शिवलिंग ठेवले. पोलिसात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी काही हालचाल केली नाही. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणात दखल द्यावी.

गोविंदाचे वकील मृत्यूंजय चटोपाध्याय यांनी आपलं म्हणणं मांडताना म्हटलं की, गोविंदाने वादग्रस्त जमीनीवर शिवलिंग ठेवलेले नाही, तर रातोरात्र त्या ठिकाणी शिवलिंग प्रकट झाले आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी वादग्रस्त जमिनीवरुन शिवलिंग हटवण्याचा निर्णय दिला. कोर्टाचा हा निर्णय नोंद करताना सहाय्यक निबंधक विश्वनाथ राय हे बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. न्यायमूर्तींनी हा सर्व प्रकार पाहता आपला निर्णय फिरवला आणि म्हटलं की हे प्रकरण खालच्या कोर्टात सिव्हिल केस म्हणून चालवण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT