Israel Embassy 
देश

Israel Embassy: दिल्लीतील इस्त्राइल दुतवासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन!

दिल्ली पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. इस्त्राइल दुतवासाबाहेर स्फोटाचा फोन आल्याचा दिल्ली पोलिसांना फोन आला. दूतावासाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.

Sandip Kapde

Israel Embassy: दिल्लीतील इस्त्राइल दुतवासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन आला आहे. दिल्ली पोलिसांकडून याची चौकशी सुरु आहे. गुन्हे युनिट आणि फॉरेन्सिक टीमही दिल्लीतील इस्त्राइल दुतावासात दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. दूतावासाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक फोन आला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने स्फोट झाल्याची चर्चा केली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. विशेष सेलची टीमही घटनास्थळी पाठवण्यात येत आहे.

अजून सुगावा नाही-

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला 5.45 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्फोटासारख्या घटनेची घटनास्थळी पुष्टी झालेली नाही आणि स्फोटाचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण परिसराची सतत चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या घटनास्थळी हजर आहेत. (Latest Marathi News)

लोकांनी मोठा आवाज ऐकला-

दिल्ली अग्निशमन सेवा संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, दिल्ली अग्निशमन सेवेला आज संध्याकाळी चाणक्यपुरी भागातील इस्राइल दूतावासाजवळ स्फोट झाल्याचा कॉल आला होता. घटनास्थळी अद्याप काहीही आढळून आलेले नाही. मात्र, समोर काश्मीर भवनही आहे. त्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, लोकांनी त्यांना मोठा आवाज ऐकल्याचे सांगितले. हा आवाज कशाचा होता हे तपासानंतरच कळेल. घटनास्थळाची चौकशी सुरू आहे.

यापूर्वीही स्फोट झाला आहे-

याआधीही दिल्लीतील इस्राइल दूतावासाला लक्ष्य करण्यात आले होते. 29 जानेवारी 2021 रोजी दिल्लीतील इस्राइली दूतावासाबाहेर IED स्फोट झाला होता. पोलिसांना घटनास्थळावरून काही बॉल बेअरिंग्सही सापडले ज्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी केला जात होता. यानंतरही इस्राइली दूतावासाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT