arvind kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal Diabetes: 'आम' आदमी पार्टी आंब्यामुळे चर्चेत! मधुमेहाचा रुग्ण आंबा खाऊ शकतो कि नाही?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित दारु घोटाळ्या प्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहेत. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अशातच त्यांच्या तब्बेती संदर्भात नवी माहिती समोर आली आहे. त्यांच्या आहारासंदर्भात राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी सुद्धा झाली.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित दारु घोटाळ्या प्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहेत. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अशातच त्यांच्या तब्बेती संदर्भात नवी माहिती समोर आली आहे. त्यांच्या आहारासंदर्भात राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी सुद्धा झाली.

याचिकेमध्ये केजरीवाल यांची साखरेची पातळी कमी- जास्त होण्याबाबत सांगतले गेले की, व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना दररोज डाॅक्टरांकडून समुपदेशन करण्यात यावे. याबद्दल बोलताना अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हंटल आहे की, "ई़डीचा आरोप आहे की, केजरीवाल हे जेलमध्य़े अश्या गोष्टी खात आहेत की त्यामुळे त्यांंची शुगर आणि ब्लड प्रेशर वाढत आहे, परंतु असे नाहीये."

केजरीवाल यांचे वकिल मनु सिंघवी म्हणाले की, "अरविंद कजरीवाल यांच्या घरुन ४८ वेळा दिलेल्या जेवणात फक्त ३ वेळा आंबे खायला दिले आहेत. तसेच त्यांनी फक्त एकदाच नवरात्रीचा प्रसाद म्हणून आलू-पूडी खाल्ली आहे. कोर्टाने दोन्ही पक्षांना आपला-आपला डायट चार्ट सादर करायला सांगितला आहे आणि कोर्टाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे."

आम आदमी आंबा नाही तर काय मशरूम खाणार ?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंबा खाण्याच्या वादावरुन दोन्ही पक्षांनी आपली मते दिली. या दरम्यान केजरीवाल यांचे वकिल रमेश गुप्तांनी प्रश्न विचारला कि, आम आदमी आंबा नाही तर काय मशरूम खाईल काय? तसेच त्यांनी तिहार जेल प्रशासनावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले.

मधुमेहचा रुग्ण आंबा खाऊ शकतो कि नाही?

जयपुरच्या आहरातज्ञ सुरभी पारिक यांनी सांगितले कि, "ज्या मधुमेहाच्या रुग्णांची साखर जास्त आहे, त्यांना आंबे द्यायला नकोत. कधीतरी कमी प्रमाणात ते दिले तरी ते चालतील, परंतु दररोज आंबे खायला देऊ शकत नाही. याच्याऐवजी पपई, सफरचंद आणि बेरी यांसारखी फळे आपण मधुमेहच्या रुग्णांना देऊ शकतो. जर तुम्ही दररोज फळे खात असाल तर त्याच प्रमाण मर्यादित ठेवा. रोज १५० ते २०० ग्रॅमपर्यंतच फळे खायला हवेत."

मधुमेहाचे रुग्ण आंबा का खाऊ शकत नाहीत?

पिकलेल्या आंब्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स ५१ ते ५६ पर्यंत असतो आणि तेवढाच ग्लाइसेमिक इंडेक्स संत्रा ज्यूसचा सुद्धा असतो. पिकलेल्या आंब्यामध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. आंबा खावा कि नाही हे प्रत्येकाच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर ठरते. ज्या लोकांना साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी इंसुलिन शाॅट्सची गरज असते, त्यांनी पिकलेला आंबा खाणे टाळले पाहिजेल.

जास्त चरबी आणि कार्ब्सवाल्या पदार्थांपासून रहा दूर

आहारतज्ञ सुरभी पारीक म्हणाल्या की, "मधुमेहाच्या रुग्णांना जास्त चरबीयुक्त पदार्थ देणे सुद्धा टाळले पाहिजेल. तसेच जास्त कार्ब्स युक्त पदार्थ म्हणजेच बटाटा, मका हे खाणे सुद्धा टाळले पाहिजेल."

मधुमेहाचे रुग्ण ज्यूस पिऊ शकतात कि नाही?

डाॅक्टर एलएच घोटेकर म्हणाले की, "मधुमेहाच्या रुग्णांनी ज्यूस पिण्याऐवजी फळांचे सेवन केले पाहिजेल." तसेच मधूमेह विशेषतज्ञ डाॅक्टर स्वप्निल जैन म्हणतात कि, "जर मधुमेहाचा रुग्ण आठवड्यातून तीन दिवस जरी ज्यूस पिला तर त्याने साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यांमुळे डाॅक्टरांचा सल्ला घेऊन आपण आहार केला पाहिजेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : 'आम्ही कुठेही जाणार नाही, सोबत यायचं असेल तर...'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सचिन तेंडुलकरसोबत होणाऱ्या तुलनेवर विराट कोहलीने मोठा भाष्य केले; म्हणाला, सचिन पाजी हे...

Parbhani News : जन्म-मृत्यू विभागाचा ढिसाळ कारभार उघड;परभणी जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

Pune News: पुण्यात उभे राहणार देशातील पहिले स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र; ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये ८०० कोटींची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT