India-Canada row 
देश

India-Canada row: कॅनडा दहशतवादी-कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान; भारताकडून जस्टिन ट्रूडो यांच्यावर हल्लाबोल

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॅनडीयन नागरिकांना भारतात प्रवेश करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. कॅनडाने केलेले आरोप फेटाळत लावत भारताने प्रत्युत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅनडा सरकारवर टीकास्त्र सोडले.

कॅनडाचे पंतप्रधान यांनी आरोप करताना कोणताही पुरावा सादर केलेला नाही. कॅनडा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे. कॅनडाची अशीच ओळख जगभरात बनली आहे. कॅनडा दहशतवादी, कट्टरतावादी आणि संघटित गुन्हेगारीला आश्रय देतंय, असं म्हणत बागची यांनी निशाणा साधला.

जगात बनत असलेल्या प्रतिमेबाबत कॅनडाने काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं की कॅनडाचा आरोप हा पूर्वग्रहदुषीत आहे. जस्टिन ट्रूडो यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे त्यांचे आरोप राजकीय प्रेरणेतून करण्यात आल्याचं दिसून येतंय असं बागची म्हणाले.

कॅनडाच्या पंतप्रधानानी आरोप केला. पण, कोणतेही पुरावे आमच्या समोर सादर केलेले नाहीत. त्यांनी काही पुरावे सादर केले तर आम्ही याप्रकरणात लक्ष घालू, पण त्यांच्याकडून तसं होत नाहीये. कॅनडामध्ये भारतविरोधी कटकारस्थान सुरु आहे. कॅनडाच्या जमिनीवरील गुन्हेगारी कृ्त्य सुरु असल्याचे पुरावे आम्ही त्यांच्यासमोर सादर केलेत. पण, त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही, असं बागची म्हणाले.

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केल्याचे खरे आहे. पण, पंतप्रधान मोदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कॅनडाचे आरोप तथ्यहीन असल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती अरिंधम बागची यांनी दिली.

बागची यांनी व्हिसा बंदीबाबतही भाष्य केलं. ज्यांच्याकडे व्हॅलिड व्हिसा, ओसीआय आहे ते भारतात प्रवास करु शकतात. कॅनडाकडून जे वातावरण तयार करण्यात आले आहे, तसेच भारतीय राजदुतावासावर जी बंदी घातली आहे. त्यामुळे आम्हाला तात्पुरत्या स्वरुपात व्हिसावर बंदी आणावी लागलीये. परिस्थितीनुसार आम्ही याबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT