Firecrackers esakal
देश

फटाक्यांवर बंदी घालू शकत नाही - सुप्रीम कोर्ट

कोलकाता हायकोर्टानं फटाकेबंदीचा दिला होता आदेश

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : फटाक्यांवर बंदी घालू शकत नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं सोमवारी दिला. याद्वारे कोलकाता हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाचे न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अजय रस्तोगी यांनी हा निर्णय दिला.

खंडपीठानं पश्चिम बंगाल सरकारकडे विचारणा केली की, "प्रतिबंधित फटाके आणि संबंधित वस्तू एन्ट्री पॉईंटवरच राज्यात आयात केल्या जाणार नाहीत याची खात्री करावी" कोविडच्या काळात हवा प्रदूषण होऊ नये यासाठी कोलकाता हायकोर्टानं फटाक्यांचा वापर आणि विक्रीवर बंदी घातली होती.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल सरकारनं केवळ ग्रीन फटाक्यांनाच रात्री ८ ते १० वाजेपर्यंत उडवण्याची परवानगी दिली होती. काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेदरम्यानचं हे फटाके वाजवता येतील असंही सरकारनं म्हटलं होतं. पण, कोलकाता हायकोर्टानं शुक्रवारी ३१ डिसेंबरपर्यंत सरसकट सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली. यामध्ये ग्रीन फटाके वाजवण्यासही हायकोर्टाकडून परवानगी नाकारण्यात आली. मात्र, मेण आणि तेलाच्या दिव्यांना यातून वगळण्यात आलं होत.

दरम्यान, आदेशापूर्वी हायकोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं की, सामान्य, प्रदूषित फटाक्यांपासून ग्रीन फटाके वेगळे करणे खूप कठीण आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य प्रशासनाने ही बंदी कायम ठेवण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांना फटाक्यांच्या वापरावर व विक्रीवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

SCROLL FOR NEXT