Corona Vaccine Dose Sakal
देश

दोन डोसवर थांबता येणार नाही; बुस्टर डोसची गरज भासणार : AIIMS

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूमध्ये नजीकच्या भविष्यात विविध उत्परिवर्तन होण्याची शक्यता असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन थांबता येणार नाही. त्यासाठी पुढील काळात नव्या लसीचे बूस्टर डोस घेण्याची गरज लागू शकेल, अशी शक्यता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. काळापरत्वे माणसांमधील रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत‌ कोरोना विषाणूमध्ये बदल झाल्यास त्याला आधी घेतलेले लसीचे डोस संसर्गापासून रोखतीलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे बूस्टर डोसचा‌ विचार करावा लागेल. या डोसच्या चाचण्या देखील सुरू आहेत. यावर्षीच्या अखेर कदाचित बूस्टर डोस उपलब्ध होतील, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. कोरोनावरील बूस्टर डोस हे लसीच्या 'सेकंड जनरेशन'मधील तसेच अधिक संशोधनातून तयार केलेले असल्याने त्याची‌ विषाणूंच्या बदलत्या रुपाला रोखण्याची क्षमता देखील जास्त असेल. त्यामुळे त्याचा लाभ अधिक होईल. परंतु त्यासाठी जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण व्हायला हवे. त्यानंतरचा पुढील टप्पा हा बूस्टर डोसचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत बायोटेकची मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस येत असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. या लसीचा अंतिम टप्पा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन लस वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. सध्या लशीच्या चाचण्या १२ ते १८, ६ ते १२ आणि २ ते ६ अशा टप्प्यांमध्ये सुरू आहेत. झायडस कॅडिला कंपनी देखील लस तयार करीत असून, त्यांनी लहान मुलांवरील चाचण्यांची माहिती देत, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. त्यांनी १२ ते १८ या वयोगटाची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले.

येत्या सप्टेंबर महिन्याच्या‌ अखेरपर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर श्रेणी पद्धतीने आपण शाळा सुरू करायला हव्यात. मुलांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यांना संरक्षण मिळेल आणि लोकांना देखील लहान मुले सुरक्षित असल्याचा आत्मविश्‍वास वाढेल.

- डॉ. रणदीप गुलेरिया‌, एम्स प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT