देश

'मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीय'; पंजाब काँग्रेसमध्ये उडणार भडका

सकाळ डिजिटल टीम

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून सांगितलं की, काँग्रेस पक्षाच्या आदेशावरून १८ सप्टेंबरला आमदारांची बैठक बोलावली आहे.

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरु झाली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात ४० आमदारांनी आवाज उठवला आहे. त्यानंतर आज आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून त्याआधी कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची दुपारी बैठक घेणार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष आता थेट सुरु झाल्याचं दिसत आहे. यात सिद्धू समर्थक आमदारांकडून दिल्लीत नाराजी व्यक्त केल्यानंतर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आता पंजाबमध्ये खांदेपालट होणार अशी चर्चाही सुरु आहे.

आमदारांच्या बैठकीसाठी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतसुद्धा उपस्थित असणार आहेत. यामध्ये दोन केंद्रीय पर्यवेक्षक अजय माकन आणि हरीश चौधरीसुद्धा असतील. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून सांगितलं की, काँग्रेस पक्षाच्या आदेशावरून १८ सप्टेंबरला आमदारांची बैठक बोलावली आहे.

पंजाब काँग्रेसचे महासचिव परगट सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर गुरुवारी CLP ची बैठक गुरुवारी बोलावण्यात आली आहे. इथं कोणाच्या अंहकाराचा प्रश्न नाही. आमदारांकडून ही मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही असेही त्यांनी सांगितलं.

सिद्धूंचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांनी ट्विट करून म्हटलं की, २०१७ साली पंजाबमध्ये आमचे ८० आमदार निवडून आले. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की काँग्रेस चांगला मुख्यमंत्री पंजाबला देऊ शकले नाही. पंजाबचे दु:ख आणि वेदना समजून घेतल्यानंतर असं वाटतं की आता मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain : पुण्यात दहा वर्षांतील सर्वाधिक वळीव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मे 2024

Abhishek Singhvi : ‘ईडी’च्या छाप्यांमुळेच भाजपकडे आला पैसा ; अभिषेक मनु सिंघवी यांचा आरोप,संविधानाच्या ढाच्यावरच आघात

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ मे २०२४ ते १८ मे २०२४)

Amol Kolhe : विधानसभा बाकी आहे, जवाब मिलेगा : कोल्हे

SCROLL FOR NEXT