captain amrinder singh sakal
देश

अमरिंदर सिंग पोहोचले शहांच्या घरी; महत्वाच्या घडामोडी शक्यता

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. या दोघांमधील भेटीनंतर पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपासून अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरणार आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सचिवांनी सिंग अमित शहा यांची भेट देणार नाहीत त्यामुळे या अफवांवर कोणी विश्वास ठेऊ नये, असं मंगळवारी म्हटलं होतं. पण आज अखेर ही अफवाच खरी ठरतेय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अमरिंदर सिंग आणि अमित शहा यांच्यात भेट सुरु असून अद्याप यातील तपशील कळू शकलेला नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कालच नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता. त्याचवेळी अमरिंदर सिंग हे अमित शहा यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे काल दिवसभर पंजाब देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT