कॅप्टन अमरिंदर सिंह sakal media
देश

भाजपसह जागावाटप लवकरच ठरवू : कॅप्टन अमरिंदर

काँग्रेसने अपमानास्पदरीत्या मुख्यमंत्रिपदावरून हटविलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : काँग्रेसने अपमानास्पदरीत्या मुख्यमंत्रिपदावरून हटविलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. पंजाब लोक काँग्रेस अशा नावाने स्थापन केलेल्या नव्या पक्षाचा भाजप तसेच सुखदेवसिंग धिंडसा यांच्या शिरोमणी अकाली दलाबरोबरील (संयुक्त) जागावाटपाचा तपशील लवकरच ठरवू अशी माहिती त्यांनी दिली.

नव्या पक्षाच्या कार्यालयाचे उद््घाटन केल्यानंतर अमरिंदर यांनी पत्रकार परिषद घेतली. जागावाटपाचा सविस्तर तपशील सांगण्यास मात्र त्यांनी नकार दर्शविला. जागावाटप तत्त्वतः ठरले आहे. आपण विजयी उमेदवार निवडावेत आणि त्यांना पाठिंबा द्यावा असे मी दोन्ही पक्षांना म्हणालो आहे, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या सदस्य भरती मोहिमेला दहा दिवसांपूर्वी प्रारंभ झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन केल्या जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले. युतीतर्फे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनण्याची अपेक्षा आहे का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, सर्व भागीदार पक्ष हा चेहरा ठरवतील.

पक्ष नुकताच काढला असला तरी तयारीच्यादृष्टिने वेळेचा मुद्दा अडचणीचा ठरणार नाही, असेही अमरिंदर यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, १९८० मध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून केवळ १४ दिवस आदी माझे नाव जाहीर करण्यात आले. मी एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकलो. जागावाटपासंदर्भात अमरिंदर हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लवकरच भेटण्याची अपेक्षा आहे.

आमचा पंजाब लोक काँग्रेस आगामी निवडणूक जिंकेल आणि सरकार स्थापन करेल. पंजाब विधानसभा जिंकणे हे आमचे ध्येय आहे आणि आम्ही ते साध्य करू.

- कॅप्टन अमरिंदर सिंग, पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

Pune Politics: मंचरमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! गद्दारीच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून आंदोलन; 'निष्ठावंतांच्या बळावरच शिवसेना मजबूत'

School Chalo Abhiyan: शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे औक्षणाने स्वागत, ताटात खीर-हलवा; ‘स्कूल चलो अभियान 2.0’ची खास सुरुवात

Mathura Pedha : मथुरेत गेलात आणि हा पेढा खाल्ला नाही? कृष्णाला प्रिय असलेली मिठाई कशी बनते ? जाणून घ्या ४०० वर्षांचा इतिहास

SCROLL FOR NEXT