ITBP Bus Accident  Sakal
देश

ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; सहा जवान शहीद

बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

ITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकाडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.

घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाचे (ITBP) 37 आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन असे 39 जण प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पहलगाममधील फ्रिसलन येथे बस दरीत कोसळली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात येणार होते. त्यासाठी या सर्व जवानांना घेऊन ही बस पहलगामहून चंदनवाडी येथे निघाली होती. त्यावेळी अचानक फ्रिसलन येथे बस 200 फूट दरीत कोसळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT