Case burning alive 8 persons birbhum tmc leaders attacked in west bengal sakal
देश

पश्‍चिम बंगाल धुमसतेय; तृणमूलच्या नेत्यांवर हल्ले; पोलिसांनी अधीर रंजन यांना रोखले

वीरभूम जिल्ह्यातील ८ जणांना जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडालेली असताना आज दोन ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : वीरभूम जिल्ह्यातील ८ जणांना जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडालेली असताना आज दोन ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले झाले. नादिया जिल्ह्यात एका तृणमूल काँग्रेस नेत्या असलेल्या महिलेच्या पतीवर गोळीबार करण्यात आला तर हुगळी जिल्ह्यात दुचाकीवरून जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या महिला नगरसेवकाला अज्ञात वाहनाने उडवले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

वीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे मंगळवारी घरांना आगी लावल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तृणमूल कॉंग्रेसचे नेते बहादूर शेख यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात घरे पेटवून दिली होती.गेल्या चोवीस तासांमध्ये हुगळी जिल्ह्यात तारकेश्‍वर भागात नवनिर्वाचित नगरसेवक रुपा सरकार यांना दुचाकीवरून घरी येत असताना अज्ञात मोटारीने जोरात धडक दिली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल रात्री घडली. दुसऱ्या घटनेत नादिया जिल्ह्यात एका स्थानिक तृणमूल नेत्यावर गोळीबार झाला. सहदेव मंडल असे त्यांचे नाव असून बगुला ग्रामपंचायत सदस्या अनिमा मंडल यांचे ते पती आहेत.

शवविच्छेदनाचा धक्कादायक अहवाल

रामपूरहाटच्या जळीतकांडातील आठ जणांचे आलेले शवविच्छेदन अहवाल आणखीच धक्कादायक आहेत. पीडितांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जाळण्यात आल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या आणि न्यायवैद्यक पथकाने अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT