देश

ED Action : ''जप्त रक्कम मंत्री आलम यांचीच'', ‘ईडी’चा न्यायालयात दावा; प्रत्येक कंत्राटामध्ये १.५ टक्के वाटा

या दोघांच्या सखोल चौकशीनंतर ‘ईडी’ने ७४ वर्षांच्या आलमगीर आलम यांनाही अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. घरगडी जहाँगीर आलम याच्या नावावर असलेल्या सदनिकेतून जप्त करण्यात आलेली रक्कम मंत्री आलमगीर आलम यांचीच असून जहाँगीरने ती सचिव संजीव लाल यांच्या सांगण्यावरूनच गोळा केली होती, असे ‘ईडी’ने न्यायालयात सांगितले.

सकाळ वृत्तेसेवा

रांची : झारखंडमधील रांची येथे काही दिवसांपूर्वी सदनिकेवर छापा घालत ३२ कोटी २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती, ती रक्कम ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचीच आहे, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने केला आहे. कंत्राट देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारून बेहिशेबी मालमत्ता गोळा करण्याच्या या प्रकरणी आलम यांना ‘ईडी’ने बुधवारी अटक केली आहे.

आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचा घरगडी राहात असलेल्या सदनिकेवर ‘ईडी’ने छापा टाकून ३२ कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केली होती. त्यानंतर संजीव लाल आणि घरगडी जहाँगीर आलम या दोघांना सहा मे रोजी अटक करण्यात झाली होती.

या दोघांच्या सखोल चौकशीनंतर ‘ईडी’ने ७४ वर्षांच्या आलमगीर आलम यांनाही अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. घरगडी जहाँगीर आलम याच्या नावावर असलेल्या सदनिकेतून जप्त करण्यात आलेली रक्कम मंत्री आलमगीर आलम यांचीच असून जहाँगीरने ती सचिव संजीव लाल यांच्या सांगण्यावरूनच गोळा केली होती, असे ‘ईडी’ने न्यायालयात सांगितले.

तसेच, ग्रामीण विकास मंत्रालयाततर्फे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक कंत्राटामागे आलमगीर आलम हे दीड टक्के लाच घेत होते, असा आरोपही करत आलम यांच्या कोठडीची मागणी ‘ईडी’ने केली. यानंतर न्यायाधीशांनी मंत्री आलम यांना सहा दिवसांची ‘ईडी’ कोठडी सुनावली.

‘ईडी’चे आरोप

- छापा घातलेल्या सदनिकेत मंत्री आलम यांची लेटरहेड सापडली

- आलम यांच्यावतीने संजीव लाल हेच लाच स्वीकारत होते

- संजीव लाल हेच कंत्राटदारांना ‘मॅनेज’ करत होते

- लाचेचा वाटा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT