Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : देशात जाणीवपूर्वक जातिनिहाय जनगणना टाळली जात आहे; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मध्य प्रदेशातील आज तिसरा दिवस. शिवपुरी येथे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पीटीआय

शिवपुरी - ‘देशात जाणीवपूर्वक जातिनिहाय जनगणना टाळली जात असून देशातील मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आदिवासींची संख्या स्पष्ट होण्यासाठी या जनगणनेचा आपण आग्रह करत आहोत. पण केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. देशासमोर बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे तीन मुद्दे ज्वलंत बनलेले असताना ते गायब केले आहेत,’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मध्य प्रदेशातील आज तिसरा दिवस. शिवपुरी येथे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेने दोन मार्च रोजी मध्य प्रदेशात प्रवेश केला आणि आज शिवपुरी येथून यात्रेची सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी आदी नेते उपस्थित होते. या यात्रेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील सामील झाले.

माधव चौकातील सभेत बोलताना ते म्हणाले, जातीनिहाय जनगणनेबाबत आपण आग्रही असून त्यामुळे देशातील मागासवर्गीयांची आकडेवारी स्पष्ट होईल. आता अदानी शस्त्रनिर्मिती उद्योगातही आले आहेत. अदानी यांची रायफल बाजारात येणार आहे. त्यांची कंपनी गोळ्यांपासून बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणार आहेत.

‘मनरेगा’चे बजेट वार्षिक ६५ हजार कोटी आहे. अशावेळी मोदी सरकारने गरिबांकडे लक्ष दिले नाही. श्रीमंताचे आणि उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले. या पैशातून मनरेगासारखी योजना राबविली असती तर ती २४ वर्ष सुरू राहिली असती. बेरोजगारीच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, आजकाल तरुण मोबाईलकडे अधिक लक्ष देत असल्याने मोबाईलधारकांचा पैसा अदानी आणि अंबानी यांच्या खिशात जात आहे, असे ते म्हणाले.

हेलिकॉप्टरची परवानगी नाकारली

राहुल गांधी यांची न्याययात्रा आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांचा गड असलेल्या शिवपुरी येथून गुना येथे पोचली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी शिवपुरी येथे रोड शो केला. सकाळच्या वेळी राहुल यांना हेलिकॉप्टरने ग्वाल्हेरहून शिवपुरी येथे यायचे होते. मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ते मोटारीतून शिवपुरी येथे पोचले. त्यामुळे न्याय यात्रा दोन तास उशिरा निघाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT