Caught with girlfriend in her room man thrashed to death by girls family and villagers at up
Caught with girlfriend in her room man thrashed to death by girls family and villagers at up 
देश

प्रेयसीच्या खोलीत नको त्या अवस्थेत सापडणाऱया प्रियकराची हत्या

वृत्तसंस्था

गोरखपूर (उत्तर प्रदेश): प्रेयसीच्या खोलीमध्ये नको त्या अवस्थेत दोघांना प्रेयसीच्या भावाने रंगेहाथ पकडले. प्रियकराला मुलीच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे,

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील शेरपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. सुरज (वय 24) हा प्रेयसीला भेटण्यासाठी रविवारी (ता. 2) तिच्या घरी गेला होता. प्रेयसीचा भाऊन गौतम हा अचानक घरी आला. दोघांना नको त्या अवस्थेत त्याने रंगेहाथ पकडले. गौतमला तिथे पाहून गोंधळूलेल्या सूरजने गौतमवर गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून गावकरीही घराच्या दिशेने धावले. गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी सूरजला पकडले व बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सुरजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

पोलिस अधिकारी सुनिल गुप्ता म्हणाले, सुरजच्या मृत्यूप्रकरणी मुलीचे वडील व भावासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरजचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास करत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

SCROLL FOR NEXT