cbi
cbi google
देश

कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयाला CBI कडून अटक

सकाळ डिजिटल टीम

सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमणला रात्री उशीरा चेन्नईत अटक केली.

बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर मोठी कारवाई केली. काल (मंगळवारी) सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयनं अटक केली आहे. व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. (cbi arrested bhaskar raman close associate of karti chidambaram)

सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमणला (s bhaskar raman) रात्री उशीरा चेन्नईत अटक केली. याच प्रकरणात (काल) सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे टाकले होते. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरित्या पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप असल्यानं आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. या प्रकरणी सीबीआय कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांची चौकशी करत होती. त्यानंतरच सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे.

सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी एक ट्वीट करत केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आतापर्यंत ही छापेमारी किती वेळा झाली, हे मोजायला मी विसरलोय. नक्कीच हा एक विक्रम असेल. दरम्यान आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली होती. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेलं जाणार आहे.

दरम्यान, INX मीडिया समूहाकडून 2007 मध्ये विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (FIPB) मंजुरीमध्ये अनियमित व्यवहार करून 305 कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळवले असल्याचा आरोप आहे. कंपनीला परकीय गुंतवणुकीची परवानगी मिळाली तेव्हा पी. चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT