Culprit arrested sakal media
देश

दिल्ली : पोलीस कर्मचारी अडकला CBI च्या जाळ्यात; ४० हजारांची मागितली होती लाच

नरेश शेंडे

नवी दिल्ली : सुलतानपूरी पोलीस ठाण्यात (Sultanpuri Police Station) दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधीत असणाऱ्या दोन आरोपींना अटक न करण्यासाठी दिल्लीतील एका पोलीस अधिकाऱ्याने एका व्यक्तीकडे ४० हजार रुपयांची लाच (bribe crime) मागितली होती. याप्रकरणी सीबीआयने (CBI) एका पोलीस अधिकाऱ्यासह (police arrested) त्याच्या सहाकाऱ्याला अटक केलीय. कुलदीप सिंग असं आरोपी पोलिसाचं नाव असून सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदावर ते काम पाहत होते. या लाच प्रकरणात सीबीआयने सिंग याचा सहकारी भगत लाल यालाही बेड्या ठोकल्या आहेत. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. ( CBI arrested Delhi Police officer and his associate in bribery crime)

सविस्तर वृत्त असं की, "सुलतानपूरी पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरोधात एका प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना अटक न करण्यासाठी आरोपीनं संबंधित व्यक्तीकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशन समोर असलेल्या एका चहा विक्रेत्याकडे पैसे देण्यासाठी आरोपीनं सांगितलं होतं". अशी माहिती सीबीआयनं दिली आहे.

दरम्यान, पोलीसाच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीआयने सापळा रचून आरोपी भगत लालला २० हजारांची लाच घेताना पकडलं. त्यानंतर हा सर्व प्रकार सिंग याच्या सांगण्यावरुन झाला असल्याचं उघड झालं. याप्रकरणाशी संबंधीत आणखी काही धागेदोरे आहेत का, याचाही तपास सीबीआयकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport and Pune citizens benefit : नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने पुणेकरांचाही होणार मोठा फायदा, जाणून घ्या कसा?

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली

डोक्यात फरक झालाय का? उर्दूसोबत झोपतो म्हणल्यावर नेटकऱ्यांचीही सटकली; सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल; असं काय म्हणाले?

Raigad News: पर्यटन हंगामाचा शुभारंभ! जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; दिवाळीसाठी सज्ज

Divorce Celebration Viral Video : दुग्धाभिषेकाने मराठमोळ्या भिडूनं साजरा केला घटस्फोट! १२ तोळ सोनं-१८ लाख रुपये रोख देऊन सुटका...

SCROLL FOR NEXT