cbi investigation esakal
देश

न्यायाधीशांबद्दल अपमानजनक पोस्ट; CBIकडून पाच जण अटकेत

विनायक होगाडे

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या विरोधात अपमानजनक पोस्ट्स टाकण्यासंदर्भात CBI ने पाच लोकांना अटक केली आहे. एजन्सीज त्यावेळी कारवाई करत नाहीत जेंव्हा खालच्या कोर्टातील न्यायधीश धमक्यांबाबत तक्रार करतात, असं वक्तव्य सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

वादग्रस्त पोस्ट्स संदर्भातील आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाची ही तक्रार दोन वर्ष जुनी आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी खटला दाखल केला होता आणि त्यानंतर तीन लोकांना अटक केली होती. या प्रकरणी आता आणखी दोन लोकांना अटक केली आहे. त्यातील एक आरोपी नुकताच कुवैतमधून परत आला आहे.

झारखंड जिल्हा न्यायाधीशाचा अलिकडेच खून झाला. त्यासंदर्भात सुनावणी सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीसनी हे वक्तव्य केलं. त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं की, सीबीआयने काहीच केलं नाही. आम्हाला अशी आशा होती की, सीबाआयच्या कार्यपद्धतीत काहीतरी बदल होईल. मात्र, काहीच बदल झाला नाही. यासोबतच त्यांनी न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत प्रलंबित असलेल्या याचिकेवर देखील त्यांनी केंद्राकडून उत्तर मागितलं.

सरन्यायाधीश एन व्ही रमणी यांनी म्हटलं होतं की, जेंव्हा न्यायाधीश सीबीआय आणि इंटेलिजन्स ब्युरोकडे धमक्यांबाबत तक्रार करतात तेंव्हा त्याबाबत कसलीच कारवाई करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT