Sheena Bora Murder Case टिम ई सकाळ
देश

शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा, चौकशीसाठी सीबीआयने मागितला वेळ

इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोरा ही जिवंत असल्याचा दावा केला होता

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी हिने इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) हिने शीना बोरा (Sheena Bora) ही जिवंत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात इंद्राणी मुखर्जी हिने सीबीआयला एक पत्र पाठवले होते. याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. आता सीबीआयने आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे 14 दिवसांचा अवधी मागितलाय.

तुरुंगातील एका कैद्याने शीनाला काश्मीरमध्ये भेटल्याचे सांगितले होते, असा दावा इंद्राणी मुखर्जीने केला होता. सीबीआय (CBI) ला एक पत्र पाठवत शीना बोरा काश्मीरमध्ये वास्तव्य करत असून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती.याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. आता सीबीआयने आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे (Special CBI court) 14 दिवसांचा अवधी मागितलाय. मात्र इंद्रायणी मुखर्जीच्या खळबळजनक दाव्याने शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Murder Case) नवीन ट्वी्स्ट येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT