CBI inquiry of sandeshkhali Order of Calcutta High Court Mamata Banerjee govt  sakal
देश

Sandeshkhali Case : संदेशखाली अत्याचाराची ‘सीबीआय’ चौकशी करा; कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश; ममता बॅनर्जींना धक्का

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिला अत्याचार व जमिनी बळकाविण्याच्या आरोपांची ‘सीबीआय’ मार्फत चौकशी करण्याचा आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने आज दिला.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिला अत्याचार व जमिनी बळकाविण्याच्या आरोपांची ‘सीबीआय’ मार्फत चौकशी करण्याचा आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने आज दिला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या सरकारला हा धक्का मानला जात आहे.

या तपासावर न्यायालयाची देखरेख राहील, असेही मुख्य न्यायाधीश टी.एस.शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.संदेशखाली येथे शेतजमिनीचे मत्स्यपालनासाठी जलस्रोतांमध्ये कथित रूपांतर करण्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने ‘सीबीआय’ला दिले.

त्यासाठी तपास संस्थेने संबंधित जमिनीची प्रत्यक्ष तपासणी करून महसुल नोंदी तपासाव्यात, त्याचप्रमाणे महिलांवरील अत्याचारांच्या आरोपांचीही चौकशी करावी व पुढील सुनावणीपर्यंत सविस्तर अहवाल द्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. या प्रकरणी दोन मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी विविध आरोप, तक्रारींची त्वरित शहानिशा करण्यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. या चौकशीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

तब्बल ६०० तक्रारी

संदेशखाली अत्याचारप्रकरणी प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात ६०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात लैंगिक अत्याचार, जमिनी बळकावण्यासह मालमत्तेचे नुकसान करणे आदी तक्रारींचा समावेश आहे. कलकत्ता उच्च न्यायालयात वकील प्रियांका तिबरेवाल यांनी या तक्रारी न्यायालयासमोर सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT