Manish Sisodia esakal
देश

Manish Sisodia : सीबीआय आई है! कारवाईनंतर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचे ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

CBI Raid at Manish Sisodia's House : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. याची माहिती खुद्द सिसोदिया यांनीच ट्वीट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी सीबीआय आली असून, त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक असून, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. मात्र,आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नसल्याची टीका केली आहे.

सीबीआयच्या या कारवाईनंतर सिसोदिया यांनी तीन ट्वीट केले आहेत. यामध्ये ते म्हणतात की, काही लोक दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामावर नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. जेणेकरून शिक्षण आरोग्याची चांगली कामे थांबवता येतील. सिसोदिया म्हणाले की, आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.

पुढे ते म्हणाले की, आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू जेणे करून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या पण काहीही बाहेर आले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.

सीएम केजरीवाल छापेमारीवर म्हणाले

दुसरीकडे, या छापेमारीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, 'ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक झाले आणि मनीष सिसोदियाचे छायाचित्र अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर छापले गेले, त्याच दिवशी केंद्राने CBI ला मनीष यांच्या घरी पाठवले. घडणाऱ्या या घडामोडींमध्ये CBI चे स्वागत असून, यापूर्वीही अनेक छापे पडले आहेत. मात्र, काही बाहेर आले नसून, आजच्या कारवाईनंतरही काही निष्पन्न होणार नसल्याचा विश्वास केजरीवील यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT