nadia rape murder case cbi arrest first accuse total arresting is three  esakal
देश

मुंबईसह देशातल्या १४ ठिकाणी CBI चे छापे; असं आहे काश्मीर कनेक्शन

या प्रकरणी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईसह देशातल्या १४ ठिकाणी सीबीआयने धाडसत्र सुरू केल्याची माहिती हाती येत आहे. मुंबईसोबतच जम्मू, दिल्ली, दरभंगा इथं सीबीआय़ने छापे टाकले आहेत. काश्मीरमधल्या चेनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टशी या छाप्यांचा संबंध जोडला जात आहे.

सीबीआय़ सध्या जम्मू, श्रीनगर, मुंबई, नोएडा, दिल्ली, तिरुवनंतपुरम, दरभंगा इथं धाडसत्र राबवत आहे. सीबीआय़ने काही दिवसांपूर्वी चेनाब व्हॅली पॉवर प्रकल्पावर केंद्र सरकारची नियमावली डावलून अयोग्यरित्या पैसे गोळा केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात हे छापे टाकले जात आहेत.

या प्रकरणी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू आहे. रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या वृत्तानुसार, हा घोटाळा ९ हजार कोटींचा असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT