amesh Pokhriyal Nishank 
देश

12 Board Exams: राज्यांकडून सूचना मागितल्या, लवकरच निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी आज राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली.

कार्तिक पुजारी

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी आज राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली.

नवी दिल्ली- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी आज राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने 12 वी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे (objective questions) असे दोन पर्याय केंद्र सरकारकडून सूचवण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार, राज्याला निर्णय घेण्यास सांगितलं आहे. ( CBSE Class 12 Board Exams Education Minister Ramesh Pokhriyal Nishank)

रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितल्यानुसार, 'राज्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली. बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना मिळाल्या'. शिक्षणमंत्री पुढे म्हणाले की, 'मी राज्यांना त्यांच्या सूचना 25 मेपर्यंत देण्यास सांगितलं आहे. 12 बोर्डाच्या परीक्षांबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि पालकांमध्ये असलेली सांशकता दूर करु. विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे'. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षेची तारीख आणि परीक्षा पद्धत 1 जून रोजी जाहीर केली जाणार आहे.

12 वीच्या परीक्षा घेण्याबाबत अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी होत आहे. पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भीती आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी राज्यांसोबत आज महत्त्वाची बैठक घेतली. 12 वी परीक्षेचा फॉर्मट छोटा केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये फक्त महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा पर्यायी उत्तराची पद्धत अवलंबली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT