arvind kejriwal Esakal
देश

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

AAP Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाकडून दावा करण्यात आलाय की, ज्या ड्रॉईंग रुममध्ये मारहाण झाली त्या रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत मारहाण आणि गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरु शकते. मात्र, आम आदमी पक्षाकडून दावा करण्यात आलाय की, ज्या ड्रॉईंग रुममध्ये मारहाण झाली त्या रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही.

दुसरीकडे दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी असाही दावा केलाय की, केजरीवाल यांच्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही आहे, पण ड्रॉईंग रुममध्ये सीसीटीव्ही नाही. यामागील कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केजरीवालांच्या निवासस्थानातील सर्व सीसीटीव्ही जप्त केले आहेत. पण ज्या ठिकाणी मालिवाल यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे, त्याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचा दावा आपकडून करण्यात आलाय.

सीसीटीव्ही फुटेज डिलिट करणे किंवा डीवीआर न दिल्याचा आरोप आपने फेटाळून लावला आहे. सौरभ भारद्वाज यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, 'ड्रॉईंग रुममध्ये सीसीटीव्ही नाही. दिल्ली पोलिसांना याची माहिती आहे. ड्रॉईंग रुममध्ये मुख्यमंत्री सर्व मंत्री आणि मोठ्या राजकीय नेत्यांसोबत भेटी घेत असतात. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलत असतात. त्यामुळे तिथे सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. तिथे काय चर्चा झाली हे तुम्ही रिकॉर्ड थोडीच करता. हा प्रोटोकॉल आहे.'

ड्रॉईंग रुममध्ये नाही पण बेडरुममध्ये प्रायवेट सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आला आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, 'बेडरुममध्ये नोकर किंवा इतर कर्मचारी जातात. काही वस्तू ठेवणे किंवा घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रायवेट सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याते आले आहेत. हा सीसीटीव्ही कॅमेरा देखील दिल्ली पोलीस घेऊन गेले आहेत.'

दरम्यान, स्वाती मालिवाल यांना अऱविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विभव कुमार यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामुद्द्यावरुन आप आक्रमक झाला आहे. रविवारी केजरीवाल यांनी भाजपच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT