Gen Bipin rawat and madhulika rawat PTI
देश

बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार | Bipin Rawat Funeral

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर शुक्रवारी (ता.९) दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दिल्ली छावणी परिसरात अंत्यसंस्कार

बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. जनरल रावत यांना दोन मुली आहेत.

तीन दिवसांचा राजकीय दुखवटा

बिपीन रावत यांचं मूळ राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये राज्य सरकारनं तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

Indian Railway: ब्रिटिश पोशाखाला अलविदा! आता भारतीय रेल्वेमध्ये गणवेशात येणार आधुनिक टच, अश्विन वैष्णव यांची घोषणा

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'चा येणार सिक्वेल ? अजयच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

SCROLL FOR NEXT