narendra modi narendra modi
देश

केंद्राकडून आणखी 44 कोटी डोसची ऑर्डर

सकाळ वृत्तसेवा

केंद्रातर्फे राज्यांना किती डोस मोफत मिळावेत याचा प्राधान्यक्रम राज्यांनीच निश्चित करावा असं सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आणखी 44 कोटी डोसची तातडीची ऑर्डर नोंदविली असून यात २५ कोटी कोव्हिशिल्ड व १९ कोटी कोव्हॅक्सिन लशींचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत राज्य सरकारांना केंद्र सरकारच सारे डोस मोफत पुरवेल, या पंतप्रधानांच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने कोरोना लसमात्रांची मोठी ऑर्डर नोंदवली आहे. २१ मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू होईल.

केंद्रातर्फे राज्यांना मोफत लस पुरवठा होईल. खासगी रुग्णालयांना ज्या २५ टक्के लसी दिल्या जातील त्यांची किंमत लस उत्पादकांतर्फेच निश्चित करण्यात येईल असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले. खासगी क्षेत्राद्वारे होणारी लसींची मागणी, तिचे वितरण व विनियोग यांची देखरेख करण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर असेल. कोणत्या रुग्णालयांकडे किती पायाभूत सुविधा आहेत व किती लसमात्रा आवश्यक आहेत याची तपासणीही राज्य सरकारी यंत्रणाच करेल.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार दुसऱ्या लाटेच्या संक्रमणाची तीव्रता झपाट्याने कमी होत चालली आहे. सध्या देशातील २०९ जिल्ह्यांमध्ये रोज १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे. ४ मे रोजी देशातील ५३१ जिल्ह्यांत दररोज १०० हून जास्त रूग्ण होते. ही संख्या २०९ पर्यंत घटली आहे. कोरोना रिकव्हरी दरही ९४.३ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. मागील २४ तासात ११ लाख ८२ हजार लोकांनी कोरोनाला हरवले, अशीही माहिती त्यांनी दिली.

लसीकरणाचे नवे दिशानिर्देश
१. केंद्रातर्फे राज्यांना किती डोस मोफत मिळावेत याचा प्राधान्यक्रम राज्यांनीच निश्चित करावा
२. आरोग्य सेवकांना प्राधान्य मिळावे, त्यानंतर ४५ वर्षांपुढील व नंतर १८ ते ४४ वयोगटाच्या लोकांना प्राधान्य द्यावे ही केंद्राची अपेक्षा
३. राज्य सरकारांनी आपापल्या प्राधान्यक्रमांनुसार अपेक्षित लसमात्रांचा आकडा केंद्राला कळवायचा आहे. त्यानंतर राज्यांना किती तारखेला किती डोस मिळतील याची माहिती केंद्र कळविणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT