7th Pay Commission  esakal
देश

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये होणार 4% वाढ

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या एक कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतन धारकांना आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता आणि डीआरमध्ये चार टक्क्यांची वाढ होणार, हे निश्चित समजलं जात आहे.

सध्या डीए अर्थात महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर असून तो वाढून ४६ टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्याची महागाईची स्थिती पाहिल्यात १२० दिवसांनंतर डीए ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यापाठोपाठ उर्वरित भत्तेही २५ टक्क्यांनी वाढतील. ग्राहक किंमत निर्देशांक जुलैमध्ये ३.३ अंकांनी वाढून १३९.७ अंकांवर पोहोचला होता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ४२ टक्के महागाई भत्ता मिळतो. ऑल इंडिया कन्झूमर प्राईज इंडेक्स आणि कंझ्युमर फूड प्राईज इंडेक्सने जारी केलेल्या डेटानुसार महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढू शकतो. अर्थात कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआर ४६ टक्के होऊ शकतो. यासंबंधीचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाला घ्यायचा आहे.

डीए आणि डीआरमध्ये होणारी वाढ ही प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये होत असते. सध्याच्या डेटावरुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन्ही भत्त्यांमध्ये ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. पुन्हा पुढील १२० दिवसांमध्ये महागाई भत्ता ५० टक्के वाढू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

महागाई भत्ता ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर उर्वरित भत्ते २५ टक्क्यांनी वाढतील. केंद्रीय कर्मचाऱ्यांनासाठी ही दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही याच धर्तीवर दिलासा मिळत असतो. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर समजली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT