nirmala sitaraman sakal media
देश

सरकारचा विमा क्षेत्रातील वाटा निर्गुंतवणुकीनंतरही राहणार- निर्मला सीतारामन

कृष्ण जोशी

मुंबई : बँका, वित्तसंस्था, विमाकंपन्या (insurance company) ही धोरणात्मक महत्वाची क्षेत्रे असल्याने निर्गुंतवणुकीनंतरही (disinvestment) त्यात सरकारचा (government) किमान वाटा (share) कायम राहील, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman) यांनी दिली आहे. कोविडकाळातही (corona) कामगिरी सुधारल्याबद्दल त्यांनी सरकारी बँकांची प्रशंसा केली.

बँका-विमा कंपन्यांमधील निर्गुंतवणुक केव्हा होईल, याबाबत त्यांनी ठाम विधान केले नाही. मात्र एलआयसी, सर्वसाधारण विमा, री इन्शुरन्स या क्षेत्रात निर्गुंतवणुकीनंतरही सरकारचा किमान वाटा राहीलच. मात्र निर्गुंतवणुकीनंतर आपले काय होईल ही भीती कर्मचाऱ्यांनी बाळगू नये. आम्ही प्रत्येकाची काळजी घेऊ, अशी हमीही त्यांनी दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एप्रिल ते जून 2021 या तिमाहीमध्येही एकूण नफा 14,012 कोटी रुपये इतका मिळविला. कोविडच्या असामान्य परिस्थितीतही या बँकांनी ही कामगिरी केल्याचे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि दुर्लक्षित क्षेत्रांच्या पतपुरवठ्यात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज वित्तमंत्र्यांनी या बैठकीत अधोरेखित केली.

निर्यातदारांच्या गरजा वेळेवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने, निर्यात प्रोत्साहन संस्था तसेच उद्योग आणि वाणिज्य संस्थांशी संवाद साधण्याचे निर्देश सीतारामन यांनी बँकांना दिले. निर्यातदार तयार करण्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनुसार बँका महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे देखील त्यांनी अधोरेखित केले. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2021 दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी हाती घेतलेल्या जनसंपर्क मोहिमेदरम्यान सुमारे पाच लाखकोटी रुपयांचे कर्ज वितरित केले होते. यावर्षी देखील अशीच कामगिरी करण्याची सूचना त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT