narendra modi
narendra modi narendra modi
देश

मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी नवीन योजना

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृत्यूदर (covid 19 death rate) जास्त आहे. याकाळात बऱ्याच चिमुकल्यांचे पोषणकर्ते दुरावले आहेत. कुणाच्या वडिलांना तर कुणाच्या आईला कोरोनाने (covid 19) हिरावले आहे. काही मुलांचे तर दोन्हीही पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. या अनाथ झालेल्या मुलांसाठी आता केंद्र सरकारने तरतूद केली आहे. या मुलांना पीएम केअर फंडातून मदत मिळणार आहे.

अनाथ मुलांसाठी नवीन योजना-

पंतप्रधान मोदींनी जी मुले कोरोनाकाळात अनाथ झाली आहेत त्यांच्यासाठी 'PM-CARES for Children’ ही योजना आणली आहे. याद्वारे अनाथ मुलांसाठी तरतूद केली जाणार आहे. या मुलांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. ही मदत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मिळणार आहे. तर वयाच्या २३ वर्षाच्या नंतर १० लाखांची मदत या फंडातून मिळणार आहे.

तसेच या अनाथ मुलांचा आयुष्यमान भारत ( Ayushman Bharat) अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे. ज्याचे हप्ते PM CARES मधून दिले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयातून (Prime Minister's Office) सांगण्यात आले आहे.

मागील काही दिवसांत देशात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात ओसरल्याचे दिसत आहे. पण याकाळात देशातील मृत्यूदर चिंतेचा विषय ठरत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे भारत जगातील हॉटस्पॉट ठरले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT