AI Answer on PM Modi 
देश

AI Answer on PM Modi: ट्रम्पच्या प्रश्नावर चुप्पी तर PM मोदींवर AI चं वादग्रस्त उत्तर, सरकार पाठवणार Google ला नोटीस! नेमकं काय घडलं?

AI Answer on PM Modi : गुगल कंपनीच्या एआय प्लॅटफॉर्म जेमिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रश्नाच्या उत्तरात निराधार आरोप फेकल्यानंतर सरकार Google ला नोटीस जारी करणार आहे .

Sandip Kapde

AI Answer on PM Modi: गुगल कंपनीच्या एआय प्लॅटफॉर्म जेमिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रश्नाच्या उत्तरात निराधार आरोप फेकल्यानंतर सरकार Google ला नोटीस जारी करणार आहे. X वर एका वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हे आयटी कायद्याच्या नियम 3(1)(b) चे थेट उल्लंघन असल्याते त्यांनी म्हटले आहे.

काय प्रकरण आहे?


एका ट्विटर वापरकर्त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला होता ज्यात त्याने जेमिनी एआयने 'पंतप्रधान मोदी फॅसिस्ट आहेत का?' या प्रश्नाचे उत्तर दिले होते.  उत्तरात लिहिले की, "नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आहेत. काही तज्ज्ञ फॅसिस्ट मानणारी काही धोरणे राबवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे आरोप अनेक कारणांवरून केले जातात, त्यातील एक म्हणजे भाजपची हिंदू राष्ट्रवादी विचारसरणी आहे." हा स्क्रीन शॉर्ट सध्या व्हायरल होत आहे.


जेमिनी एआयने ट्रम्प अन् झेलेन्स्कीबाबत स्पष्ट उत्तर दिले नाही-


जेव्हा गुगलच्या जेमिनी एआयला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबद्दल हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ट्रम्पबद्दल जेमिनी एआयने लिहिले की, "निवडणूक हा झपाट्याने बदलणारी माहिती असलेला गुंतागुंतीचा विषय आहे. तुमच्याकडे सर्वात अचूक माहिती असल्याची खात्री करण्यासाठी Google वर शोधा." या उत्तरानंतर गुगलच्या एआय टूलवर टीकेची झोड उठली आहे.

केंद्र सरकारने काय दिला इशारा?

या पोस्टला उत्तर देताना, राजीव चंद्रशेखर यांनी लिहिले, 'हे आयटी कायद्याच्या मध्यस्थ नियमांचे नियम 3(1)(B) आणि फौजदारी संहितेच्या अनेक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.' त्यांनी आयटी मंत्रालय, गुगल आणि त्यांच्या एआय टीमला टॅग केले आहे.

कारणे दाखवा नोटीस पाठवणार -

या प्रकरणावर, आयटी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "हे दुसऱ्यांदा घडले आहे. की गुगलच्या एआय सिस्टमने पक्षपाती उत्तरे दिली. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एआय सिस्टम जेमिनी काही लोकांबाबात चुकीचे विचार निर्माण करत आहे. जर आम्हाला उत्तर समाधानकारक नाही वाटले तर आम्ही तर Google वर खटला दाखल केला जाईल."

यापूर्वीही गुगलच्या एआय टूलला टीकेचा सामना करावा लागला आहे. जेमिनी आणि चॅटजीपीटी सारख्या एआय प्लॅटफॉर्मच्या भविष्याबद्दल कायदेतज्ज्ञ आणि टेक कंपन्यांमधील संघर्ष आणखी वाढू शकतो. यापूर्वी, अनेक वापरकर्त्यांनी जेमिनी एआयवर ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप केला होता आणि त्याचे काही पुरावे देखील शेअर केले होते. गुगलने माफी मागितली होती आणि सांगितले होते की ते एआय टूलला येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT