Student_JEE 
देश

CBSE दहावी परीक्षा रद्द; निकाल कसा लागणार शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट

सकाळ न्यूज नेटवर्क

CBSE 10th board exam : नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं वातावरण दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १२वीच्या परीक्षांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. 

परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थी तसेच पालकांच्या मनात निकालाबाबतचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी रद्द करण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल कसा लावण्यात येणार आहे, याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बारावीची परीक्षा येत्या ४ ते १४ मे या कालावधीत होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे.

येत्या एक जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षेची तारीख निश्‍चित करण्यापूर्वी १५ दिवस विद्यार्थ्यांना सूचित केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षा कधी होणार, होणार की नाही, अशी चिंता लागून असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल हा मंडळाने तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. यात पद्धतीने दिलेले गुण हे कमी वाटत असल्यास विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भाव निवळल्यानंतर दहावीच्या परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

सीबीएसईच्या परीक्षांबाबत निर्णय झाला असला, तरी आयसीएसईच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या मंडळाशी संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अजूनही धास्ती कायम आहे. मात्र, सीबीएसईप्रमाणेच या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात येतील, असे सरकारी स्तरावरून सांगण्यात येत आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT