Sidhu Moose Wala esakal
देश

Sidhu Moose Wala : 'सिद्धू मुसेवालाच्या आईने नियमांचं पालन केलं नाही का?' केंद्राचं पंजाब सरकारला पत्र

Sidhu Moose Wala : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. सिद्धूची आई चरण कौर आणि पिता बलकौर सिंह यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. याची माहिती खुद्द बलकौर सिंह यांनी दिली होती.

संतोष कानडे

Sidhu Moose Wala : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. सिद्धूची आई चरण कौर आणि पिता बलकौर सिंह यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. याची माहिती खुद्द बलकौर सिंह यांनी दिली होती. चरण कौर यांनी ५८ व्या वर्षी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला. यावरुन आता केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडे आयव्हीएफ ट्रिटमेंटवर विस्तृत रिपोर्ट मागवला आहे.

देशात IVF साठी तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार, केवळ २१ ते ५० वर्षे वयाच्या मध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने महिला बाळाला जन्म देऊ शकते. परंतु दिवंगत गायक सिद्धूची आई चरण कौर यांनी ५८व्या वर्षी बाळाला जन्म दिला. मंत्रालयाने कौर यांच्या वयाचा उल्लेख करत कायद्यानुसार सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) सेवा घेणाऱ्या महिलांचं वय २१ ते ५० असल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने १४ मार्च रोजी एक पत्र पाठवून पंजाब सरकारकडून चरण कौर यांचे आयव्हीएफ रिपोर्ट मागवले आहेत. यासाठी त्यांनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे. यामध्ये म्हटलंय की, कौर यांनी ५८ व्या वर्षी आयव्हीएफ उपचार घेतले. सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम २०२१ च्या कलम २१ (जी) (आय) नुसार एआरटी सेवांमध्ये महिलांसाठी सुधारित वय २१ ते ५० वर्षे इतकं आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष घालून एआरटी (नियमन) अधिनियम २०२१ च्या नुसार केलेल्या कारवाईचा रिपोर्ट द्यावा.

दरम्यान, सरकार आम्हाला त्रास देत असल्याचं बलकौर यांनी म्हटलंय. ते व्हिडीओमध्ये म्हणतात, "वाहेगुरुंच्या आशीर्वादाने आमचा शुभदीप काही दिवसांपूर्वी परत आला आहे, मात्र, सरकार मला त्रास देतंय. ते मला बाळाची कागदपत्रे देण्यास सांगत आहेत. हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते माझी चौकशी करत आहेत.

ते पुढे म्हणतात, माझी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याककडे विनंती करतो की, माझ्या पत्नीचे उपचार पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबा. मी इथलाच आहे, तुम्ही मला जेव्हा कॉल कराल तेव्हा मी तुमच्याकडे चौकशीसाठी येईन आणि मी सर्व कायदेशीर कागदपत्रे देईन. फक्त माझ्या पत्नीची ट्रीटमेंट आधी पूर्ण होऊद्यात." असा एका व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT