KartavyaPath Sakal
देश

PM मोदींच्या महत्त्वकांक्षी 'Central Vista Avenueचंं आज उद्घाटन

पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागोजागी सुरू असलेले काम, बोटिंगसाठीचे छोटे तलाव, विविध फुलांनी बहरलेले ताटवे यांचे दूर-दर्शनही नयनरम्य भासते आहे. हजारो कामगार कामावर अखेरचा हात फिरवत आहेत, राजपथ नव्हे आता ‘कर्तव्य’ पथ सजला आहे. ‘इंडिया गेट’ किंवा रफी मार्गावरून नजर टाकली तरी नवीन सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा ३.९० लाख चौरस मीटरचा परिसर हिरवाईने नटलेला दिसतो. सरदार नारायण सिंह यांची निर्मिती असलेल्या ‘राजपथा’चे काम १९२० च्या आसपास झाले. या रस्त्याचे नाव ‘किंग्ज वे’ असे होते. १९६१ मध्ये नाव या रस्त्याचे नाव ‘राजपथ’ असे केले.

राज्यांचे स्टॉल लागणार

महाराष्ट्रासह किमान २२ राज्यांची ओळख असलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांचे स्टॉल येथे असतील. या ॲव्हेन्यूचा इंडिया गेट ते मानसिंह मार्गापर्यंतचा टप्पा नागरिकांसाठी येत्या गुरुवारपासून खुला होणार आहे. त्यापुढे संसदेपर्यंत मुख्य सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरू राहणार आहे. या भागात चोवीस तास ५० सुरक्षारक्षक व स्वच्छता कर्मचारी तैनात असतील. शिवाय ३०० सीसीटीव्हीदेखील लोकांवर ‘नजर'' ठेवतील.

दीड वर्षांत झाला कायापालट

राजपथावरील प्रस्तावित सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यूचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. ८) होणार आहे. फेब्रुवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या जेमतेम दीड वर्षांत या भागाचा कायापालट झाला आहे.

अशी असेल रचना

  • राजपथाच्या दोन्ही बाजूंच्या कालव्यांपैकी १९ एकर भागाचे नूतनीकरण, छोटे १६ पूल या कालव्यांना जोडतील

  • सध्याच्या कृषी भवनाच्या मागील बाजूच्या तलावांत बोटिंगची सुविधा असेल

  • नागरिकांना फिरण्यासाठी १५.५ किमीचे लाल ग्रॅनाईटचे पदपथ असतील

  • येथील पार्किंगच्या जागेत १ हजार १२५ वाहनांची व्यवस्था असेल

  • मोठ्या बससाठी इंडिया गेटजवळ जागा निश्चित करण्यात आली असून एका वेळी ४० बस उभ्या राहतील

  • पार्किंग सुरुवातीला एक-दीड महिन्यासाठी विनामूल्य असेल नंतर त्याचे दर नवी दिल्ली महानगरपालिका ठरवेल

  • राजपथाची शोभा वाढविणारे ७५ ऐतिहासिक पथदिव्यांचे नव्याने सौंदर्यीकरण केले आहे. याशिवाय नवीन भागात ९०० दिवे असतील

शॉपिंगची चंगळ

ज्यांना राजपथावर खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी प्रत्येकी ४० विक्रेत्यांचे व ८-८ दुकानांत विभागलेले ५ विभाग तयार करण्यात आले आहेत. येथे महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या २०० विक्रेत्यांचे स्टॉल असतील. दोन्ही भागांना जोडण्यासाठी षटकोनी आकाराचे चार भूमिगत पादपथ (अंडरपास) असतील.

झाडे न तोडण्याच्या सूचना

मानसिंग रोड ते जनपथ, जनपथ ते रफी ​​मार्ग गुरुवारपासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. उर्वरित दोन भाग- इंडिया गेट आणि सी-हेक्सॅगन नंतर सामान्यांसाठी खुले होतील. राजपथाच्या दोन्ही बाजूंना जी झाडे तोडली गेली त्यात जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणावर होती. या रस्त्यावर सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यू परिसरात जुनी- नवी मिळून सुमारे ५००० झाडे आहेत. प्राचीन वृक्ष सरसकट तोडू नका अशा सूचना दिल्या गेल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT