देश

‘सेंट्रल व्हिस्टा’चे बांधकाम सुरू; संसदेची नवीन इमारत २०२२ पर्यंत पूर्ण होणार

पीटीआय

नवी दिल्ली - केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा’चे बांधकाम शुक्रवारी सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ महिनाभरापूर्वी पार  पडला होता.  

संसदेची नवी इमारत त्रिकोणी आकाराची असून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  बांधकामाच्या जागेवर खोदकामास सुरुवात झाली आहे. इमारत वेळेत पूर्ण होण्यासाठी पुरेसे मजूर काम करत आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. 

टाटा प्रोजेक्टस लि.कडून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीसाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामाला ३५ दिवस विलंबाने सुरुवात झाली असली तरी, बांधकाम वेळेवर पूर्ण करण्याची ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या ३५ दिवसांमध्ये बाह्य भागातील दगड, कारपेट आदींची खरेदी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या आठवड्यातच वारसा समितीच्या १४ सदस्यीय पथकानेही संसदेच्या नव्या इमारतीला मंजुरी दिली होती. 

‘सेंट्रल व्हिस्टा’ च्या बांधकामाचा आमचा कृती आराखडा यापूर्वीच तयार झाला आहे. कुशल मनुष्यबळासारख्या स्त्रोतांत वाढ करून इमारतीच्या बांधकामाला गती दिली जाईल.
- संदीप नवलाखे, उपाध्यक्ष, टाटा प्रोजेक्टस लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT