central vista project Sakal
देश

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या खर्चात २९ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा खर्च सुमारे २९ टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा खर्च सुमारे २९ टक्क्यांनी वाढला आहे. नवे संसद भवन बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट्सला देण्यात आले आहे. डिसेंबर २०२०मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे गेल्या वर्षभरात ४० टक्के काम झाले आहे. सुरुवातीला हे बांधकाम ७५ व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. (Central Vista Project)

मात्र नंतर त्याची मुदत ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक निर्बंध देशभरात लादण्यात आले होते. बांधकामांनाही काही काळ बंदी घालण्यात आली होती. मात्रा सेंट्रल व्हिस्टाच्या कामावर बंदी घालण्यात आली नव्हती.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीसाठीचा खर्च आता वाढला आहे. काही अतिरिक्त कामांमुळे त्याचा खर्च आता २८२ कोटींनी वाढला आहे. बांधकाम बजेटमध्ये २९ टक्के वाढ झाल्याने, नवीन संसद भवनाचा अंदाजित खर्च १२०० कोटींच्या पुढे गेला आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी यापूर्वी ९७७ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती.

नवीन संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असेल आणि अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित काम होईल. एकूण ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही इमारत चार मजली असणार आहे. नवीन संसद भवनात जाण्यासाठी सहा मार्ग असतील. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी एक प्रवेशद्वार असेल. लोकसभेचे सभापती, राज्यसभा अध्यक्ष, खासदारांच्या प्रवेशासाठी एक प्रवेशद्वार आणि दोन सार्वजनिक प्रवेशद्वार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT