Central Vista Avenue Sakal
देश

Central Vista वाढवेल देशाची शोभा; चार लाख स्क्वेअर फुटात पसरलेला प्रकल्प कसा असेल?

वैष्णवी कारंजकर

केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या ऐतिहासिक राजपथाचं सुशोभिकरण करण्यात आलं आहे. त्याचं नामांतरही आता होत असून हा कर्तव्यपथ नावाने ओळखला जाणार आहे. १९ महिने हे काम सुरू होतं. आज या सेंट्रल व्हिस्टा अॅव्हेन्यूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

याच भागात इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण होणार आहे. सुशोभिकरणानंतर आता या भागामध्ये सहलीला बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे इथं लोकांना हिरवळीवर बसणं, खाणं-पिणं याला बंदी असणार आहे. या नव्या भागामध्ये चोरी आणि नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी ८० सुरक्षा रक्षक या भागावर लक्ष ठेवणार आहेत.

राजपथाच्या दोन्ही बाजूचा ३.९० लाख चौरस मीटरचा भाग हिरवळीने सुशोभित करण्यात आला आहे. नव्या लाल ग्रॅनाईट वॉकवेचीही निर्मिती करण्यात आली असून याची लांबी १५.५ किलोमीटरपेक्षाही अधिक आहे. या भागामध्ये १,११२५ गाड्या पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. ९०० हून अधिक लाईटचे खांबही इथं बसवण्यात आले आहे. या भागामध्ये ३०० पेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

इथल्या दोन कालव्यांमध्ये बोटींग करता येणार आहे. इथं आठ व्हेंडिंग प्लाझा असतील. ज्यामध्ये आईस्क्रीमसह अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, ४० विक्रेते इथं उपलब्ध असतील. या सेंट्रल व्हिस्टामध्ये ४०० पेक्षा जास्त बाकडी, अॅम्फी थिएटर, महिलांसाठी ६४ तर पुरुषांसाठी ३२ आणि दिव्यांगांसाठी १० टॉयलेट्स, भुयारी मार्ग, १६ पादचारी मार्ग यांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT