modi
modi esakal
देश

Documentary Row : केंद्राची मोठी कारवाई; PM मोदींवरील डॉक्युमेंटरीचे ट्वीट ब्लॉक करण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

PM Modi BBC Documentary Row : पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीवरील ट्विट, यूट्यूब व्हिडिओ ब्लॉक करण्याचे केंद्राचे आदेश आहेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या एपिसोडचे यूट्यूबवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

‘इंडियाः द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेले ५० हून अधिक ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन बीबीसीकडून करण्यात आले आहे.

माहिती आणि प्रसारण सचिवांनी IT नियम, 2021 अंतर्गत अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत.

नेमकी डॉक्युमेंट्री काय?

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं (BBC) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटातून मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला असून भारताविरोधातील हा प्रपोगंडा असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यात ते म्हणाले होते की, "हा माहितीपट म्हणजे भारताविरोधात अपप्रचाराचा प्रयत्न आहे. या माहितीपटातून हे स्पष्ट होतं की, ही फिल्म बनवणारे लोक ठराविक विचारांनी प्रेरित आहेत. त्यांनी जे यातून मांडलं आहे त्यात तथ्य नाही. हा प्रकार गुलामीची मानसिकता दर्शवते. आम्हाला माहिती नाही की यामागे कसला अजेंडा आहे?"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT