Agnipath scheme Sakal
देश

अग्निपथला वाढता विरोध; भाजपच्या 10 नेत्यांना Y सुरक्षा देण्याचा निर्णय

अग्निपथ योजनेला बिहारमध्ये सर्वाधिक विरोध करण्यात येत असून, येथे अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पाटना : केंद्राच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध वाढताना दिसून असताना आता बिहारमधील भाजपच्या 10 नेत्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या सर्वांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेला बिहारमध्ये सर्वाधिक विरोध करण्यात येत असून, येथे आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

वाढत्या विरोधादरम्यान वाढवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल, आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल, दरभंगाचे आमदार संजय सरोगी आणि दिघ्यातील आमदार संजीव चौरसिया यांच्यासह उपमुख्यमंत्र्यां समावेश आहे. यासोबतच आमदार अशोक अग्रवाल, दिलीप जैस्वाल आणि खासदार गोपाल जी ठाकूर यांनाही Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावर या योजनेवरून देशाच्या विविध भागात गदारोळ सुरू असतानाच हल्ला झाला होता. तसेच बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावरही आंदोलकांनी तोडफोड केली होती. हल्ल्याच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कुटुंबातील अनेक सदस्य अडकल्याचेही सांगण्यात येत आहे. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी फोन करून मीडियाला याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्या सध्या पाटण्यात आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य बेतिया येथे आहेत आणि त्यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT