नवी दिल्ली: बारावीच्या परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. देशातील अनेक बोर्डांनी कोविड परिस्थितीमुळे (covid situation) १२ वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई, आयसीएसईसह ३२ बोर्डांसाठी परीक्षा मुल्यांकनाचे एकसमान धोरण (uniform assessment policy) असू शकत नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. (Centre tells SC that there can not be one uniform assessment policy for all boards)
सर्व शिक्षण मंडळ स्वायत्त असून त्यांच्या धोरणानुसार मुल्यांकनाचा त्यांना अधिकार आहे, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. यंदा सीबीएसई, आणि आयसीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे तसेच राज्यातील शिक्षण मंडळांसाठी मुल्यांकनाचे एकसमान निकष असावेत, अशी सुद्धा काही याचिकांमधून मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.