Mansukh Mandaviya esakal
देश

'भारत अत्यावश्यक औषधांसाठी 100 टक्के आत्मनिर्भर होणार'

सकाळ डिजिटल टीम

'भारतात औषधं, वैद्यकीय उपकरणं इत्यादींची मागणीही वाढलीय.'

'वर्ल्ड ऑफ मेडिसिन' भारतानं आतापर्यंत औषध उत्पादनासाठी इतर देशांवरील 25 टक्के अवलंबित्व दूर केलंय. कोरोना महामारीपासून धडा घेतल्यानंतर सरकारनं अत्यावश्यक औषधांसाठी देश 100 टक्के आत्मनिर्भर करण्याचा निर्णय घेतलाय. कोणत्याही देशातून 100 टक्के आयात संपुष्टात येऊ शकत नाही. मात्र, ज्या वस्तूंची सर्वाधिक गरज आहे, त्यावरील अवलंबित्व नक्कीच कमी करता येईल, असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr. Mansukh Mandaviya) यांनी शुक्रवारी व्यक्त केलं.

गेल्या दोन वर्षांत भारतानंही कोरोना (Coronavirus) महामारीत हे सिद्ध केलंय. पीपीई किट ते व्हेंटिलेटर आणि कोरोना चाचणी किट व्यतिरिक्त लसी हे सर्वात महत्वाचं परिणाम आहेत. मांडविया पुढं म्हणाले, 'काही काळापर्यंत अत्यावश्यक औषधांसाठी सुमारे 53 प्रकारचा कच्चा माल (एपीआय) होता, ज्यांचं देशांतर्गत उत्पादन खूपच मर्यादित होतं. ९० टक्क्यांहून अधिक माल इतर देशांतून यायचा, पण गेल्या दोन-तीन वर्षांत परिस्थिती बदललीय. सध्या देशभरातील 25 प्लांटमध्ये त्याचं उत्पादन केलं जात आहे.'

आयुष्मान भारत (Ayushman Bharat) आणि इतर विमा संरक्षण योजनांद्वारे आरोग्य सेवा मिळणं सोपं झालंय. भारतात औषधं, वैद्यकीय उपकरणं इत्यादींची मागणीही वाढलीय. आता सरकारला ही मागणी, तसंच जगातील इतर देशांची गरज पूर्ण करायची आहे. त्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरूय. देशांतर्गत उत्पादन आणि स्वावलंबन वाढवणं आवश्यक आहे. कारण, देशाला त्याची कधीही गरज भासू शकते. हे सर्व गेल्या दोन वर्षांत दिसून आलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, 7 वी आंतरराष्ट्रीय फार्मा आणि चिकित्सीय उपकरण परिषद 25 ते 27 एप्रिल दरम्यान होणार आहे. गेल्या वर्षी ही परिषद ऑनलाइन झाली होती. मात्र, यावेळी भारतासह जगभरातील फार्मा दिग्गज सहभागी होणार आहेत. 'मिशन 2047' चं लक्ष्य घेऊन ही परिषद होत आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT