Nirmala Sitaraman ANI
देश

केंद्राचा मोठा निर्णय; नोकरी गमावलेल्यांना २०२२ पर्यंत मिळणार 'पीएफ'

मनरेगाचं बजेट १ लाख कोटींपर्यंत वाढवलं

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळं नोकरी गमवावी लागलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ज्यांनी कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांच्या पीएफ खात्यात सन २०२२ पर्यंत पीएफचा हिस्सा जमा करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पण ज्यांची ईपीएफओत नोंदणी असेल त्यांनाच या सुविधेचा फायदा मिळेल, असंही अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

मनरेगाचं बजेट वाढवून केलं १ लाख कोटी रुपये

सीतारामन म्हणाल्या, कोरोनामुळं रोजगाराचं मोठं संकट निर्माण झालं आहे. या वर्षाचं मनरेगाचं बजेट ६० हजार कोटी रुपयांवरुन वाढवून एक लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे.

लघु आणि मध्यम उद्योगांना दिली योग्य ओळख

अर्थमंत्री म्हणाल्या, अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) दशकांपर्यंत जे स्थान मिळालं नाही. ते स्थान केंद्रातील मोदी सरकारनं मिळवून दिलं आहे. या क्षेत्राला मोदी सरकारनं एक विशेष ओळख दिली. यापुढेही या क्षेत्राला अधिक चांगली ओळख मिळवून दिली जाईल. गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने खूपच वेगळ्या गोष्टी केल्या आहेत. सरकारने या क्षेत्राची व्याख्या खूपच लवचिकपणे बदलली आहे. नुकतंच संसेदत एक विधेयक आणलं गेलं होतं त्यामुळे या क्षेत्राला थेटपणे फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

SCROLL FOR NEXT