देश

धक्कादायक! खासगी रुग्णालयांकडे एक कोटी डोस पडून

नामदेव कुंभार

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरिही धोका कायम आहे. असं असतानाच देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 21 जून 2021 पासून देशभरात मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही लस पुरवठा करण्यात आला आहे. पण खासगी रुग्णालयात मोफत लस नाही, त्यामुळे लोकांचा कल सरकारी रुग्णालयाकडे असल्याचं दिसतेय. बुधवारी केंद्र सरकारने देशातील खासगी रुग्णालयात एक कोटी 8 लाख कोविशील्ड लसींचे डोस शिल्लक असल्याचं सांगितलं आहे. मागील दोन महिन्यात देशातील खासगी रुग्णालयाला दोन कोटी लसीचे डोस देण्यात आले होते. मात्र, यामधील एक कोटींपेक्षा जास्त लसी पडून आहेत.

खुल्या बाजारांतील नियमांनुसार, खासगी रुग्णांलयांना 25 टक्के लसी खरेदी करण्याचा आधिकार केंद्र सरकारने दिला आहे. त्यानुसार, एक मे ते 22 जून पर्यंत कोविशील्डच्या एक कोटी 97 लाख डोस खासगी रुग्णालयाने खरेदी केले होते. उपलब्ध लस साठ्यानुसार, 22 जून पर्यंत 88 लाख 9 हजार डोसचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच देशात खासगी रुग्णालयात प्रति दिवस एक लाख 71 हजार लसींचे डोस वापरण्यात आले आहेत.

एका आधिकाऱ्यानं सांगितले की, खासगी रुग्णालयाने उपलब्ध लस पुरवठ्याची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. त्यानुसार, सर्वाधिक साठा महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयात आहे. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयाके 26.33 लाख डोस अद्याप शिल्लक आहेत. कर्नाटक (16.74 लाख) आणि पश्चिम बंगाल (16.65 लाख) येथील खासगी रुग्णालयातही लसींचे डोस शिल्लक आहेत. कोव्हॅक्सीन लसीच्या साठ्यांबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, याचं प्रमाण कमी असू शकतं.

महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयात 26.36 लाख डोसचा वापर -

महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयाने दोन महिन्यात 52.69 लाख डोस खरेदी केले आहेत. यापैकी 26.36 लाख डोसचा वापर करण्यात आला आहे. कर्नाटकमधील खासगी रुग्णालयात 31.68 लाख पैकी 14.93 लाख डोसचा वापर करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालने 26.90 लाख पैकी 38 टक्के डोसचा म्हणजे 10.24 लाख लसींचा वापर झाला आहे. दिल्लीमध्ये 33 टक्के लसींचा वापर झाला आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात 5.40 लाख लसीचे डोस वापरण्यात आले आहेत.

10 राज्यात 89 टक्के लसींचा साठा शिल्लक

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, दहा राज्यातील खासगी रुग्णालयात जवळपास 89 टक्के लसींचा साठा शिल्लक आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्लीमधील खासगी रुग्णालयात 89 टक्के लस साठा आहे.

बिहारमधील खासगी रुग्णालयात सर्वात कमी वापर-

खासगी रुग्णालयातील एकूण साठ्यापैकी दहा टक्केंपेक्षा कमी लस वापरण्यात आलेल्या राज्यात मिजोरम, बिहार, मणिपूर आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील खासगी रुग्णालयात 25 हजारांपेक्षा कमी लस खरेदी केल्या होत्या. दमन आणि दीवमधील खासगी रुग्णालयाने 150 लसी खरेदी केल्या होत्या. यामधील 55 लसींचा वापर झाला आहे.

लस वापरण्यात गोवा सर्वात पुढे -

खासगी रुग्णालयात लस वापरण्यात गोवा आघाडीवर आहे. गोवासह गुजरात आणि हरियाणामधील खासगी रुग्णालयात सर्वाधिक लसींचा वापर करण्यात आला आहे. या राज्यातील खासगी रुग्णालयात 63 ते 60 टक्के लसी वापरण्यात आल्या आहेत. गोव्यातील खासगी रुग्णालयाने 15,650 लसी खरेदी केल्या आहेत. तर गुजरातने 3.89 लाख आणि हरियाणाने 6.50 लाख लसींचे डोस खरेदी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दीड वर्षांनंतर नरेंद्र मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! तिकडे अमेरिकेच्या कारवाईत तीन भारतीयांचा मृत्यू; देशात संताप

VIDEO : तुकाराम मुंढे यांचं रक्त काढून...! माजी राज्यमंत्र्याची अजब मागणी, मुख्य सचिवांना लिहिलं पत्र...

Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

Latest Marathi News Live Update : अमरावती काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार?

Waste Project Tender Issue : दक्षताच्या सूचना झुगारुन कचरा प्रकल्पाची निविदा; ठरावीक ठेकादारांना पायघड्या

SCROLL FOR NEXT