Cervical Cancer 
देश

Cervical cancer प्रतिबंधक लस कधी मिळणार? किती असेल किंमत? जाणून घ्या

सर्व्हिकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या कर्करोगावर सीरम इन्स्टिट्युटनं लस विकसित केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सर्व्हिकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या कर्करोगावर सीरम इन्स्टिट्युटनं लस विकसित केली आहे. या लसीचं आज अधिकृतरित्या लॉन्चिंग होणार आहे. पण या प्रतिबंधक लसीची किंमत किती असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर याचं उत्तर अदर पुनावाला यांनी दिली आहे. (Cervical cancer prevention vaccine price may fixed Adar Poonawalla gives info)

येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही कॉड्रिव्हेलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिनची (qHPV) किंमत जाहीर करु. लसीची निर्मिती आणि भारत सरकारशी याबाबत चर्चा केल्यानंतर आम्ही याच्या किंमतीबाबत अंतिम निर्णय घेऊ. येत्या काही महिन्यांत ही लस भारतात सर्वांसाठी उपलब्ध होईल. आपल्या देशातच पहिल्यांदा ही लस दिली जाईल त्यानंतर ती जगभरातील देशांना पाठवली जाईल. या लसीची किंमत २०० रुपये ते ४०० रुपयांच्या दरम्यान असेल पण अद्याप किंमतीवर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. २ वर्षात २०० मिलियन डोस आम्ही तयार करणार आहोत, असं यावेळी अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांचे धन्यवाद - जितेंद्र सिंह

गर्भाशयाच्या कर्करोगावर भारतानं स्वदेशी लस बनवली आहे. याद्वारे तरुण वयातील मुलींना या आजारापासून प्रतिबंध होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद कारण त्यांच्यामुळं आता आपल्याला ही प्रतिबंधात्मक लस स्वस्तात उपलब्ध होणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

दर ८ मिनिटाला एका महिलेचा होतो मृत्यू

गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध भारतातील पहिल्या कॉड्रिव्हेलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (qHPV) ला नुकतीच भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने मार्केट ऑथरायजेशनसाठी मंजूरी दिली आहे. या एचपीव्ही लसीचा उद्देश महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवणे हा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे देशात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. हा आजार टाळता येऊ शकतो, पण तो लवकर ओळखला तरच ते शक्य असून आणि ते सापडताच त्याच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे असते.

कशी असेल लस?

सध्या जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध आहेत. पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस आणि दुसरी बायव्हॅलेंट लस आहे. हेपॅटायटीस बी लसीप्रमाणेच VLP (Virus-like particles) ही लस आहे. या लसीच्या आगमनामुळं गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यास मदत होणार असून या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT