देश

बोगद्यातून पाच मृतदेह काढले; मृतांचा आकडा ४६; बचाव कार्यास वेग

वृत्तसंस्था

चमोली - हिमप्रकोपानंतर तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यापाशी सुरु असलेल्या बचाव कार्याला यश येत असून रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. बोगद्यात सुमारे ३० कामगार अडकल्याची भीती आहे.

जवान अथक बचाव कार्य करीत असून त्यांनी ७५ मिलिमीटर व्यासाचे १२ मीटर लांबीचे भुयार खणले आहे. गेल्या रविवारपासून यासाठी प्रयत्न सुरु होते. दरम्यान, हिमनदीचे पाणी शिरलेल्या रैणी गावातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे.

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे (एनटीपीसी) सरव्यवस्थापक आर. पी. अहिरवाल यांनी सांगितले की, बोगद्यातून पाणी किंवा चिखल बाहेर येत नाही, मात्र चिखलामुळे कॅमेरा वापरून शोध घेणे अशक्य ठरले आहे. आतापर्यंत आम्ही ७५ मिलिमीटर व्यासाचा बोगदा खणला असून तो साधारण २५०-३००  मिलिमीटरपर्यंत मोठा करण्याचे काम सुरु आहे.

धौलीगंगा नदीचे पाणी बोगद्यांतून सारखे वाहत असले तरी बेपत्ता असलेल्यांना वाचविता येईल अशी आशा जवानांना अजूनही आहे.

अद्याप बेपत्ता असलेल्यांची संख्या १५८ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. 

नातेवाइकांचा ठिय्या
बोगद्यापाशी बचावकार्य करणारे जवान अहोरात्र सक्रिय आहेत. यानंतरही अद्याप बेपत्ता असलेल्या काही जणांचे नातेवाईक तेथे ठिय्या मांडून आहेत. बचाव कार्य पुरेशा वेगाने होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तेथील पाण्याची पातळी नव्याने वाढल्याचा इशारा अधिकाऱ्यानी दिल्यानंतरही स्थानिकांनी एकत्र येऊन कित्येक तास ठिय्या मांडला. त्यात काही बचावलेल्यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT